योग एक प्रतिबंध उपाय
गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “योग
म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत
तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र
आहे”. योगाचे एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही युवक असा की वयोवृद्ध निरोगी असा की
आजारी योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायी आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो
वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते मग आपण शारीरिक आसनांसोबत
अंतर्गत सूक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो.
योग आपल्या साठी कधीही नवीन नव्हता. आपण हे सर्व
अगदी बालपणापासून करत आलो आहोत मग ते पाठीचा कणा मजबूत करणारे मार्जारासन असो की
पचनशक्ती वाढवणारे पवन मुक्तासन असो. आपण शिशूंना दिवसभर काही ना काही योगक्रिया
करताना पाहतो हर एक व्यक्तीला योगाचे वेगवेगळे महत्त्व आणि आवश्यकता आहे. योग
प्रत्येकाच्या जीवनाची आदर्श दिशा ठरवण्यासाठी सहाय्य करायला दृढ संकल्प आहे.
वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा
शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती
द्यायला योग समर्थ आहे योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा
बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्यांचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे
आपल्याला सहज लक्षात येतात परंतु प्रत्यक्षात शरीर मन श्वासोश्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित
फायदे होतात. तुमचे मन शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखली गेल्याने
जीवनाचा प्रवास शांत आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.
एक मात्र लक्षात ठेवा योग ही एक सतत चालणारी
प्रक्रिया आहे तिचा सराव सतत करत राहा!
मराठी विभाग
सौ. राखी खानविलकर.
Comments
Post a Comment