कथा – कडवीनआजी
तुम्ही कथेचे नाव वाचताच तुम्हाला वाटले असेल कडू म्हणजे काय ? आजी कधी कडू असते का ? तर तसे नाही. ही कथा आहे सौ. लक्ष्मीबाई कडू ह्या स्त्रीची आहे. माझ्या बालपणात भेटलेली ही आजी. तर जाणू या हिच्याविषयी. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील तरसव गावातील कडवाडी म्हणून कुणबी समाजाची ही वाडी होती. ह्या वाडी मध्ये सुंदर असे जांबा दगडाचे चिरेबंदी असे घर होते. स्वतंत्र पूर्व काळातले घर म्हणजे श्रीमंती दरवाजामध्ये लोळत होती. कुणबी समाजातील हे खोतांना टक्कर देणारे असे घर होते. सौ. लक्ष्मीबाई मारुतीराव कडू लग्न करून आमच्या गावात आली आणि सर्वांची आई व माझी आजी कशी झाली ही एक कथा आहे.
श्री. मारुती
कडू हे आपल्याला स्वतंत्र मिळण्या अगोदरपासून कस्टम विभागात अधिकारी होते, त्या
काळातील पदवीधर त्यामुळे पगार भरपूर होती. मुंबईला जाऊन नोकरी करणारे गावातले
एकमेव व्यक्ती होते. खूप सुखाचा संसार
चालला होता. त्यांचे हे वैभव खोत लोकांच्या डोळ्यात खुपत होते ते काही ना काही
कारण काढून भांडण करत असत. कडू कुटुंबाला चार मुले झाली खूप छान चालले होते पण एके
दिवशी मारुती यांना ताप आला व त्यांचा मृत्यू झाला. ऐन तारुण्यात असताना
लक्ष्मीबाई विधवा झाली. तिने हार मानली नाही, मोठ्या कष्टाने तिने आपल्या मुलांना
वाढवले व घराचा डोलारा अबाधित ठेवला. माझी आजी तिची खास मैत्रीण होती तिने तिला
खूप साथ दिली. माझे बाबा तिच्या शेवटच्या मुलाच्या वयाचे म्हणून ती त्यांना बावाच
म्हणत असे. नियतीने काय वाढून ठेवले होते कि तिचे चार ही मुले प्लेग च्या साठी
मध्ये मरण पावले. ती हताश झाली होती. पण तिने विचार केला माझ्या सारखे अश्या बायका
कितीतरी आहेत आपण एक वेगळी दुनिया तयार करूया कारण खोतांना वाटत होते ही बाई
आत्महत्या करेल. माझ्या आजीने व वडिलांनी तिला धीर दिला.
मुलांच्या मृत्यू नंतर जीवनाचा रहाटगाडा तिने सुरु केला. गावातील गरीब मग ती
अस्पृश्य असो किंवा खोतांची मुले असो तिने त्या मुलांना आसरा दिला आपली सर्व
संपत्ती त्यांच्यासाठी खर्च केले. आता तिची ओळख कडवाडी तील आई म्हणून झाली. माझ्या
आजीचे मृत्यू अल्पशा आजाराने झाले ह्याचे दुखः तिला खूप झाले. पाच वर्षांनंतर एके
दिवशी ती बाबांना म्हणाली, “तुला मुलगी झाली तर तिला शिक्षिका बनव माझी खूप इच्छा
होती एकतरी नातीला शिक्षिका बनवेल. काही महिन्यात माझा जन्म झाला. तिने मला पाहताच
तिने बाबांना त्या शब्दांची आठवण करून दिली, बाबांनी मान डोलावली. ती माझ्यावर खूप
प्रेम करत असे जणू तिला जगण्याची उमेद मिळाली होती. मी तिला आजी म्हणून हाक मारत असे, मला शिकलेली पाहून तिने माझ्या नावाने काही
पैसे व जमीन ठेवली. अशी ही प्रेमळ आजी दुसऱ्यानं साठी आपले जीवन व्यतीत करणारी कडवीन
आजीकडून मी हेच शिकली जीवनाकडे चांगल्या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे. तिचे नेहमीचे
बोल होते – ‘दुखाने खचून जायचे नाही, जे आहे त्यामध्ये आनंद मानायचा’ हे तिचे बोल आजही माझ्या सारख्या लोकांना जगण्याचा उत्साह देतात. जिवंत असे
पर्यंत सगळ्यांसाठी जगली.
मी ह्या कडवीन
आजीला शतशःनमन करते व पुढला जन्म मिळाला तर अशी आजी मला पुन्हा मिळो!
धन्यवाद!
मराठी विभाग
सौ. राखी खानविलकर.
Comments
Post a Comment