MAZE RATNAGIRI - MARATHI DEPARTMENT
Marathi Department - Rakhi Khanwilkar
येवा कोकण आपुलाच असा…… अश्या गोड कोकणातला एक मोठा जिल्हा
रत्नागिरी! समुद्र लाभलेल्या जिल्हयाची शानच काही न्यारी असते… थकलेले
भागलेले जीव रोजच्या राहाटगाडग्याला कंटाळुन समुद्राच्या ओढीने काही क्षण
निवांत व्हायला येतात आणि समुद्राला आपल्या हृदयात साठवुन माघारी वळतात…
आज माझ्या रत्नागिरीवर लिहावेसे वाटले, गेली एकोणीस वर्षे मी रत्नागिरी मध्ये येत आहे.
हे शहर इतके आवडले कि मी येथे माझे घर बांधले. आज आपण रत्नागिरी बद्दल
जाणून घेऊ या ..... रत्नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६
जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस
सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर
उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
रत्नागिरीला काय काय आहे? अहो काय नाही विचारा… समुद्र, निसर्ग, मासे, जहाजातली
सफर, आंबे, विशेषतः कोकणचा हापुस, काजु बदाम, सुकामेवा असं बरच काही
अनुभवायचं असेल बघायचं असेल तर कोकण सफर करायलाच हवी. रत्नागिरीच्या
पश्चिमेला सहयाद्रीच्या पर्वतरांगा पहायला मिळतात. मराठयांच्या इतिहासात रत्नागिरीचे
आगळेवेगळे महत्व पहायला मिळते. रत्नागिरी साता-यातील राजांच्या ताब्यात सुमारे
१७३१ ते १८१८ पर्यंत होते पण पुढे १८१८
पासुन इंग्रजांनी यावर ताबा मिळवला. येथे एक किल्ला देखील आहे जो
वीजापुरातील राजपरिवाराने बनविला ई.स. १६७० ला छत्रपती शिवाजी महाराजांनी
त्या किल्ल्याची डागडुजी करवीली होती. रत्नागिरी जिल्हयात एकुण ९ तालुके
आहेत. रत्नागिरी, खेड, गुहागर, चिपळुण, दापोली, मंडणगड, राजापुर, लांजा, संगमेश्वर.
रत्नागिरीमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८२.१८ % सावित्री आणि वैष्णवी या जिल्हयातील
महत्वाच्या नद्या. समुद्राशी संबंधीत व्यवसाय रत्नागिरीत मोठया प्रमाणात असुन येथील
अर्थव्यवस्था ब-याच प्रमाणात समुद्राशी निगडीत आहे. या ठिकाणचा हापुस आंबा
फार प्रसिध्द असुन विदेशात देखील निर्यात केला जातो. नारळ, काजु, फणस, आमसुल
(रातांबा) सूध्दा मुबलक प्रमाणात होतात. या ठिकाणी प्रामुख्याने तांदळाची शेती केली
जाते. दापोलीचे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ प्रसिध्द असुन नवनवीन
संशोधनं या ठिकाणी होत असतात. बरेच गड आणि किल्ले या जिल्हयात आजही
आपल्याला पहायला मिळतात त्यातले काही महत्वाचे म्हणजे जयगड, पालगड, पूर्णगड,
प्रचितगड, भवानीगड, महिपतगड, यशवंतगड, रत्नदुर्ग, विजयगड, सुवर्णदुर्ग, गोपाळगड,
गोविंदगड, जयगड हे सांगता येतील. रत्नागिरीचा महत्वाचा व्यवसाय मासेमारी आहे.
रत्नागिरी अरबी समुद्राच्या किनारी वसलेले शहर असुन भारतातील एक महत्वाचे बंदर
आहे. स्वातंत्र्य लढयात ज्यांचे योगदान महत्वाचे होते असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,
गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे, शिक्षणतज्ञ समाजसेवक भारतरत्न महर्षी धोंडो
केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरीचाच. भारतरत्न आचार्य विनोबा भावे, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत,
भारतरत्न सचिन तेंडुलकर हे मुळात रत्नागिरी जिल्हयातलेच! थिबा पॅलेस, दिपस्तंभ,
काळया आणि पांढ-या वाळुचे समुद्रकिनारे, भाट्ये चैपाटी, टिळक स्मारक, काळा समुद्र,
भगवती बंदर ही पर्यटन स्थळं भेट देण्यासारखी आहेत. परमेश्वराचा वरदहस्त लाभलेला
रत्नागिरी जिल्हा! गणपतीपुळे, कसबा, आडिवरे, पावस, मार्लेश्वर अशी बरीच तिर्थक्षेत्र या
जिल्हयात आपल्याला पहायला मिळतात. रत्नागिरी पासुन साधारण ४० कि.मी. अंतरावर
गणपतीपुळे हे स्वयंभु गणेशाचे मंदिर असुन साधारण ४०० वर्षांपुर्वी पासुन हे मंदिर
असल्याचे येथील भावीक सांगतात. स्वयंभु गणेशाचे हे मंदिर मनाला शांतता देणारे आणि
नयनरम्य परिसरात असल्यामुळे येथे पर्यटकांची आणि भाविकांची बरीच गर्दी नेहमीच
पहायला मिळते. समुद्र किनारा आणि मंदिर अगदी जवळ असुन मंदिरातुन बाहेर
पडल्यानंतर आपण थेट समुद्र किना.यावर पोहोचतो. मंदिर स्वयंभु असुन या मंदिराला
प्रदक्षिणा घालायची झाल्यास संपुर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते, ते अंतर साधारण
१ कि.मी. एवढे असुन समुद्र, हिरवागार परिसर, नारळी पोफळीच्या बागा यामुळे मनाला
प्रसन्नता लाभते.


Comments
Post a Comment