वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे !

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे !

  प्रसिद्ध निसर्गसंशोधक जॉन मूर म्हणाले होते," तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही वाळवंट दाखवणार का ?
    डार्विनचा उत्क्रांदीवाद सांगतो, "उपयोग नसलेल्या गोष्टी नष्ट होवून जातात."निसर्ग अभ्यासक अमित टिल्लू म्हणतात," तुम्ही काहीच न करणे हेच खुप काही करण्यासारखे आहे".
  आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे,आपल्याला आपले आयुर्वेद जपायचा असेल तर आपल्याला आपली वनश्रीसृष्टी जपावीच लागेल. झाडांना,फुलांना,पानांना जपणे म्हणजे त्यांच्यापासून दूर जाणे नव्हे,तर त्यांच्या जवळ जाणे. आपल्या मुलांना त्यांची ओळख करुन देणे, त्यांच्या उपयोगाबद्दल, त्यांचा सांस्कृतिक महत्वाबद्दल मुलांना माहीती करुन देणे,तरच त्यांना त्यांच्याबद्दल ओढ निर्माण होईल.
    आजच अशी परिस्थीती आहे की नेहमीच्या दिसणाऱ्या अनेक वनस्पती ओळखता येत नाहीत. आपटा आणि कांचन यातील फरक  दरवर्षी कानीकपाळी ओरडून सांगावा लागतो.बिट्टी आणि कण्हेर यातला फरक बहुतेकांना माहीती नाही. माका ओळखणे अनेकांना कठीण जाते. अशा असंख्य वनस्पती उपयोग नाही म्हणून नष्ट होत आहेत. माणूस पैशाने समृद्ध झाला की निसर्गाची समृद्धी अडगळ वाटू लागते. मुलांना झाडांजवळ जावू दे, या झाडपानांची ओळख व्हावी म्हणूनच तर आपल्या संस्कृतीने त्यांना सणात गुंफले तर नसेल ना ? ती झा ,पानं,फुलं पैसे मिळवून देतायत तो पर्यंत ती जपली जातायत,फायदा संपला, उपयोग संपला की त्यांचे अस्तित्व ही संपुष्टात आणले जाईल. कालपरवा पर्यंत उपयोगी असलेला भेरली माड, पुनई, पारंगा आता निरुपयोगी ठरलेयत आणि हळूहळू दिसेनासे होतायत, निदान परशुरामच्या भूमीतून तरी. तरी एक नशीब भेरली माडाला शोभेच झाड म्हणून मान मिळत आहे
 
    रायगड जिल्ह्या कोकण विभाग , कोकणातील निसर्ग, कोकणातील संस्कृती हळूहळू हरवून जातेय. हे सगळीकडे होण्यापूर्वीच आपल्याला आपला निसर्ग,आपली संस्कृती आणि आपले पारंपारिक ज्ञान जपायला शिकायला हवे. निसर्ग जपण्याच्या नादात निसर्ग आणि आपण यांच्यामध्ये तटबंदी उभी  करता कामा नये.म्हणजेच मुलांना लहानपणी मुक्तपणे मातीत खेळू द्या .पाळीव प्राणी तर हल्ली सर्व पाळतात .त्याला स्वत:च्या मुलापेक्षाही जास्त जपतात . तसेच झाडांशी बोलायला शिकवा ,त्यांना जपायला  सांगा . तरच निसर्ग अस्तित्वात राहील .


             कण्हेर                                  बिट्टी

 

   
            

              

                माका                                         भेरळ

  

पुनई    






Comments

Popular posts from this blog

DT-MUN (DAV Thane Model United Nations)

DAV UNITED FESTIVAL