Marathi Department - Chetana Gujar
नव्याचा हव्यास आणि पर्यावरणाचा ऱ्हास
आज आपण सर्वत्र एकच पाहत चर्चा ऐकत आहोत की प्रदूषण वाढले आहे. पूर्वी एवढे प्रदूषण नव्हते .पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे.मग असा प्रश्न पडतो की हे कशामुळे झाले?या गोष्टीला जबाबदार कोण?आपला विकासच याला कारणीभूत आहेत का? की आपण चुकीच्या पद्धतीने विकासाची वाटचाल करीत आहोत?
मानवाने निसर्गाच्या विरोधात जाऊन अनेक बदल घडवून आणले.चुका केल्या त्या सुधारणाचा प्रयत्न ही केला गेला .मोठमोठ्या वृक्षांची कत्तल झाली आणि सिमेंट वाळूच्या भिंती उभ्या राहिल्या.त्याच्याच जोडीला प्लॅस्टिकचा भस्मासूर उभा राहिला.पण त्याची विल्हेवाट मात्र लावायचे राहूनच गेले. प्लॅस्टिकचा वापर आपण २०व्या शतकापासून सुरु केला.परंतु त्याच्या वापराचा अतिरेक झाला आहे. आमच्या बालपणी घरात अनेक डालडा,तेल यांचे डबे दिसत होते.त्याच बरोबर तांब्या पितळेचे,काही प्रमाणात अॅल्युमिनीअमची भांडी मोठ्याप्रमाणावर वापरली जात होती पण प्लॅस्टिकचा शोध लागला आणि तांब्या पितळेच्या भांड्यांनी अडगळीची जागा घेतली कारण प्लॅस्टिक दिसायला आकर्षक साफ करायला सोपे वाटू लागले.
पूर्वी म्हणजे आमच्या पिढीमध्ये कोणतीही वस्तू मागीतली की लगेच मिळत नव्हती आहे त्यालाच दुरुस्त करून वापर करणे ही पद्धत होती. प्लॅस्टिकच्या डब्यातील वस्तूसंपली की त्याचा उपयोग धान्य भरण्यासाठी होत असे त्यामुळे आम्हीही हे समजून होतो की कपडे फाटले ,चप्पल तुटली तर ती शिवून पुन्हा वापरायची पण आता तशी परिस्थिती राहिली नाही.२१व्या शतकातील पिढीला मोठमोठे मॉल्स,शॉपिंग सेंटर यांची भूल पडली.स्त्रिया स्वत: पैसा कमवू लागल्यामुळे आवडेल ती मनात येईल ती वस्तू खरेदी करू लागल्या मग तिची गरज असो वा नसो.त्यामुळेच प्लॅस्टिकचे प्रमाण वाढले याचा घातक परिणाम मात्र सर्व मानवच नाही तर प्राणीमात्रांवर होत आहे. त्यावर उपाययोजना शोधण्यात पैसा आणि वेळ दोन्ही वाया घालवायचे.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या या प्लॅस्टिकचा वापर वाढत गेला. तेच प्लॅस्टिक अजूनही नष्ट झालेले नाही.त्याचे विघटन होण्यासाठी अनेक वर्षे लागतात.मला वाटत २०५० पर्यत जगभरातील समुद्रातील जेवढे प्राणी आहे त्यांच्या तिपटीने गोळा होईल तेवढे प्लॅस्टिक आताच तयार झाले आहे. याचा परिणाम निसर्गातील असणारे पशुपक्षी ,प्राणी ,झाडे पुढच्या पिढीला बघायला राहतील की हा मोठा प्रश्न आहे.आता येणारा अवेळी पाऊस हे आपल्याला धोक्याची घंटा देत आहे असे म्हणावे लागेल..
त्यासाठी आपण याची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे .तुटलेली ,फाटलेली पण परत दुरुस्त होईल ती वस्तू पुन्हा वापरात आणली पाहिजे.तिचा पुनर्र वापर केला पाहिजे.मग त्यासाठी आपण बांबूपासून तयार केलेल्या वस्तू ,तसेच पितळी भांड्यांचा वापर करणे चालू केला पाहिजे .नको पण हौस म्हणून घरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा मोह टाळला पाहिजे.मोठ्यांनी लहानांना याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.तरच हा निसर्गाचा फळा येणाऱ्या पिढीला चित्र काढण्यासाठी शिल्लक राहील.

Khub Chaan lihile aahe Miss. Wonderful!!!
ReplyDeleteखूप छान मॅडम,
ReplyDeleteमाझ्या आई ने अजूनही सर्व भांडी जपून ठेवली आहेत. आणि अजूनही वापरात आहेत. त्यांना चमकवण्यासाठी खूप मेहनत घेते. आणि आवर्जून सांगते की मी मेल्यावर ही आठवण राहू दया नाही तर मोडून टाकाल.
Very Nice Miss😀😃
ReplyDelete