मराठी भाषेचा लिपी इतिहास
देवनागरी लिपी ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख
लेखन पद्धती आहे. संस्कृत, पाली, मराठी, कोकणी, हिंदी, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, भोजपुरी, मैथिली, रोमानी
इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व
देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते.
देवलोक आणि नागरलोक या संबंधी विविध प्रकारच्या लेखनासाठी
उपयोजिली जाणारी लिपी, ती देवनागरी लिपी होय.
मोडी लिखाण - देवनागिरी लिपीची जलद लिपी म्हणून मोडी लिपी ओळखली जाते. लेखणी कमीत कमी वेळा
उचलून भरभर लिहिता यावे म्हणून या लिपीची निर्मिती झाली. मोडी लिपीला पिशाच्यलिपी
म्हणून ओळखली जाते. जवळ जवळ ७०० वर्षपुर्वी देवनागरी लिपी प्रचलित होती. देवनागरीत काना, मात्रा, इकार, उकार देताना प्रत्येक वेळी हात उचलावा लागे तो वेळ वाचावा व अतिजलद लिहिता
यावे म्हणून मोडी लिपीचा वापर सुरू झाला. मोडी लिपीत लिहिताना प्रथम डावीकडून
उजवीकडे पूर्ण शिरोरेघ आखून अक्षरे न मोडता कमीतकमी हात उचलून लिहण्यास सुरुवात
करतात. मोडी अक्षर सरळ नसून वळणदार आहे. आकार व काना शक्यतो खालून वर लिहून
दुसऱ्या अक्षराला जोडतात. मोडी लिपीत शब्द व वाक्य कुठे तोडावे याला बंधन नाही.
मोडी लिपीत सर्व इकार दीर्घ असतात व सर्व उकार ऱ्हस्व असतात. मोडी लिपीत एकेरी
उकार व इकार असल्यामुळे व्याकरणात कमी चुका होतात.
मोडी लिपीत
व्यंजनाचे तीन विशिष्ट प्रकार आहे –
ü जे स्वराबरोबर जोडल्यास
आपले अस्तित्व टिकवून ठेवतात व बाळबोध प्रकाराप्रमाणे असतात.
ü जे आपले अस्तिव काही ठराविक
व्यंजनासोबतच बदलतात.
ü जे स्वर व व्यंजनातून जोडाक्षरे बनतात व त्या स्वरावरून आपले अस्तित्व
टिकवतात.
मोडीलिपीचा इतिहास
प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना मोडी लिहिणाऱ्यापेक्षा मोडी
वाचणारा अधिक प्रज्ञावान असावा असे म्हणतात. जलद लिखाण व लपेटीउक्त
लेखनपद्धती, विविध कालगणना, रेघी मांडणी, मायने, शब्दसंक्षेप, शिक्के किंवा मुद्रा,
सांकेतिक नावे, अपभ्रष्ट नावे, स्थलनामे, व्यक्तिनामे, शब्दार्थ , गुढअर्थ, पदव्या,
'किताब, विशिष्ट खुणा किंवा निशाण्या हे विषय परस्परांशी संबधित व अवलंबित
आहेत.
भारतात मगध साम्राराज्यात मोरेवंशाचे महपराक्रमी राजेचंद्रगुप्त सम्राठ अशोक यांच्या
काळात मोडी अस्तित्वात आली असे मानले सातशे वर्षापूर्वी दक्षिण हिंदुस्थानात यादवांचे
साम्राज्य होते महादेवराव यादवांचे कारकिर्दीत हेमाडपंत नामक प्रख्यात महामंत्री होऊन
गेला ई १२६० श १९८२ त्यानी यादव राजाशीघन यांच्या वेळेपासून दरबारचे काम
संस्कृत भाषेत चालत असे परंतु हेमाद्रिने राजकीय कागदपत्र, सनदा, दानपत्रे ,फर्माने,
हुकुंनामे, निवाडेपत्रे, इनामपत्रे वैगरे मराठीत लिहीण्याचा नवीन
उपक्रम सुरू केला.
काळानुसार मोडीलिपीचे यादवकालीन, शिवकालीन, पेशेवेकालिन आणि आग्लकलिन असे
ढोबळ विभाग पाडता येतील.
यादवकालीन इतिहास –
यादवकाळ : (श.१३०० ते श.१६३०)
याकाळात लेखनासाठी सामान्यतः बोरूचा वापर करीत.
बोरू म्हणजे ७ ते ८ इंच लांब बाजूच्या तुकड्याच्या टोकाला तिरपा छेद देऊन तिची
लेखणी तयारकरीत. त्यामुळे हस्ताक्षर जाडे आकाराने मोठे स्ष्पट आणि त्याचे वाचन
सुलभ असे. बोरुने लेखन करताना एक अक्षर काढताना तो वारवार शाईच्या दौतीत
बुडवावा लागत असे. महादेवराव यादावाचे काळात मराठी भाषेला आणि मोडीलिपीला
राज्यकारभारात स्थान मिळाल्याने जनमानसात इतकी रुजली की पुढे
अहमदनगर, विजापुर गोवळकोंडे येथील मुसलमान राज्यकर्ते आपली फर्माने,
हुकुमनामे, निवाड्पत्रे, दानपत्रे, इनामपत्रे लिहिताना मोडीचा
अवलंब करीत असत.
v शिवकालीन इतिहास –
शिवकाळ (श.१६३० ते शके १७१४): यावेळी लेखनातून बोरूचा वापर कमी होऊन त्याजागी
झाले. टाकाने लिहीणे सुरू झाले. टाकाने लिहिलेला मजकूर लपेटीदार आकाराने लहान
गुंतागूतीचा असे त्यात अनेक शब्द संक्षेप वापरले जाऊ लागले बऱ्याच सुधारणा करून
लेखनाचा वेग वाढविला मात्र त्यात अरबी, फारशी भाषेतील शब्द येऊ लागले.
शिवकालीन १७व्या शतकात चिटणीशी पद्धत विकसित झाली. बाळाजी आवजी हा राजे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सचिव होता त्याने मोडी लिपी तयार केली असे
काही लोक म्हणतात.
पेशेवेकालीन इतिहास -
१८व्या शतकात पेशवे काळात चिटणीसी, बिल्वकारी, महादेवपंती व रानडी पद्धत असे
प्रकार होते.
आंग्लकालीन इतिहास –
ब्रिटिशकालीन मोडी ब्रिटिश काळा हा मोडीचा शेवटचा काळ होता. इंग्रज राजवट सुरु
झाल्यावर छापखाने सुरु झाले. मोडी लिपी छापखान्याच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीची
होती. जुलै १९१७ रोजी मुंबई प्रांत अधिकारी यांनी मोडी लिपी बंद करण्याचा निर्णय
घेतला, तरीही शाळा व इतर व्यापरी ठिकाणी मोडी लिपी प्रचलित होती. इ. स. १९५२
पर्यन्त हि अस्तित्वात होती.
v इतिहासाच्या दृष्टीकोनातून
केलेला विचार –
इतिहास हा कल्पनेवरुन लिहिता येत नाही, त्यामध्ये ललित सारख्या रंजक किवा तर्कावर
आधारीत गोष्टी लिहून चालत नाही, कल्पनेवर वा तर्कावर लिहिलेल्या इतिहासाचे
संशोधकीय दृष्ट्या काहीच मूल्य नाही. खरा इतिहास लिहिण्यासाठी अस्सल साधनांचा
संदर्भ महत्वाचा असतो, अशी प्रमुख अस्सल कागदपत्रे बहुतांशी मोडी लिपीत आज
उपलब्ध आहेत, गरज आहे ती फक्त शोधण्याची, अभ्यास करण्याची, खरा इतिहास
समजण्यासाठी मोडी लिपी अवगत करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा मोडी लिपी
कागदपत्रांचा अमूल्य ठेवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दफ्तरखान्यांत दडलेला आहे. त्याला
बाहेर काढून
त्याचे वाचन होणे गरजेचे आहे.
‘शिवराज्याभिषेक’ (देवनागरी)
.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी नियोजित तारखेपूर्वी कित्येक महिने आधीपासूनच सुरु झाली होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती प्राचिन परंपरा आणि राजनीती वरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा परंपरा ह्यांचा अभ्यास केला.
राज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातील ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सर्व मिळून सुमारे लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. होती. त्यांना रोज मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यातील प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छ. शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.त्यानंतर महारांजांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. पुजा केली आणि ते रायगडवर १२ मे १६७४ ला परत आले.
पान क्र. २
तुळजापूरला भवानी देवीच्या दर्शनाला त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापणा केलेल्या भवानी मातेच्या दर्शनाला गेले. त्यावेळी सव्वामण सोन्याची छत्री भावानीमातेला अर्पण केली. २१ मेला पुन्हा रायगडावर ते धार्मिकविधीत सुखून गेले. महाराजांनी २८ मेला प्रायश्चित्त केले, जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभबट्टांनी ७००० होन तर ईतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.
दुसऱ्या दिवशी महाराजांनी सोने, चांदी, तांबे, जस्त, कथिल, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनि वेगवेगलि तुला केली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गूळ, फुले इत्यादींच्या तुला झाल्या.
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला त्यादिवशी पहाटे ऊठून मंत्रोच्चार आणि सहकारांबरोबर आंघोळ करून कुलदेवतेला स्मरून राज्याभिषेक सुरु झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभुषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या.
पान क्र. ३ |
सुवासणीनींनी पंचारती ओवाळली. या नंतर शिवाजीमहाराजांनी लाल वस्त्र परिधान केले. जडजवाहीर अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले एक राजमुकुट घातला. आपल्या तलवार आणि धनुष्य बाणाची पूजा केली. मुहूर्ताच्या वेळी सिहांसनाच्या दालनात प्रवेश केला. राज्याभिषेकाचे दालन हिंदूपरंपरे नुसार ३२ शकुनाचीन्हाची सजवलेले होते. १४ लाख रुपये मुल्य असलेले ३२ मण भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले.
|
पान क्र. ४ |
ब्राह्मणांनी मोठ्या सुरात मंत्रोच्चारण केले. प्रजेने महाराजांना आशीर्वाद दिले. शिवाराजाकी जय च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याची फुले उधळली गेली. विविध तालवांजे व सूरवाद्य यांच्या जयघोषाने आसमंत भरून गेला. ठरल्या प्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राज्यांच्या डोक्यावर मोत्यांची झालर ठेवत छत्रपती म्हणून उच्चार केला. राजेशिवाजीमहाराजांनी सर्वजणांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकूण सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्री गणांनी सिहासनापुढे जाऊन महाराजांना अभिवादन केले छत्रपतींनी त्यांना याप्रसंगी विविध पदे, नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर शिवाजीमहाराज पहिल्यांदा एका हेखाड्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवे झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्ठ प्रधान आणि इतर सैन्य होते, रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनानी पुढे कुरमुरे उधळले, दिवे ओवाळले. रायगडावर विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज परतले.
अशक्य असे काहीही नाही या जगात!
आपण फक्त आपले मन मोठे ठेवले पाहिजे.



Nice 👍
ReplyDeleteVery nicely explained 👍👍
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteVery nicely explained
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteNice Information 👍
ReplyDeleteNice Information 👍👍
ReplyDeleteNicely Explained
Nice information 👍
DeleteNicely Explained
,Nice Information 👍
ReplyDeletenice information
ReplyDeleteNice
DeleteNicely explain and very important information .
ReplyDeleteअत्यंत माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteVery Nice
ReplyDeleteNoce
ReplyDeleteNice
ReplyDelete