Posts

Showing posts from April, 2024
Image
  योग एक प्रतिबंध उपाय योग हा युज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यातविलीन होणे. योग ही भारतातील पाच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असासमज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे. ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो खरे तर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळखझाली योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.            गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे”. योगाचे एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही युवक असा की वयोवृद्ध निरोगी असा की आजारी योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायी आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सूक्ष्मतेवर अ...
Image
कथा – कडवीनआजी    तुम्ही कथेचे नाव वाचताच तुम्हाला वाटले असेल कडू म्हणजे काय ? आजी कधी कडू असते का ? तर तसे नाही. ही कथा आहे सौ. लक्ष्मीबाई कडू ह्या स्त्रीची आहे. माझ्या बालपणात भेटलेली ही आजी. तर जाणू  या हिच्याविषयी. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील तरसव गावातील कडवाडी म्हणून कुणबी समाजाची ही वाडी होती. ह्या वाडी मध्ये सुंदर असे जांबा दगडाचे चिरेबंदी असे घर होते. स्वतंत्र पूर्व काळातले घर म्हणजे श्रीमंती दरवाजामध्ये लोळत होती. कुणबी समाजातील हे खोतांना टक्कर देणारे असे घर होते. सौ. लक्ष्मीबाई मारुतीराव कडू लग्न करून आमच्या गावात आली आणि सर्वांची आई व माझी आजी कशी झाली ही एक कथा आहे.                               श्री. मारुती कडू हे आपल्याला स्वतंत्र मिळण्या अगोदरपासून कस्टम विभागात अधिकारी होते, त्या काळातील पदवीधर त्यामुळे पगार भरपूर होती. मुंबईला जाऊन नोकरी करणारे गावातले एकमेव व्यक्ती होते.  खूप सुखाचा संसार चालला होता. त्यांचे हे वैभव ...