Marathi Department - Chetana Gujar नव्याचा हव्यास आणि पर्यावरणाचा ऱ्हास आज आपण सर्वत्र एकच पाहत चर्चा ऐकत आहोत की प्रदूषण वाढले आहे. पूर्वी एवढे प्रदूषण नव्हते .पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे.मग असा प्रश्न पडतो की हे कशामुळे झाले?या गोष्टीला जबाबदार कोण?आपला विकासच याला कारणीभूत आहेत का? की आपण चुकीच्या पद्धतीने विकासाची वाटचाल करीत आहोत? मानवाने निसर्गाच्या विरोधात जाऊन अनेक बदल घडवून आणले.चुका केल्या त्या सुधारणाचा प्रयत्न ही केला गेला .मोठमोठ्या वृक्षांची कत्तल झाली आणि सिमेंट वाळूच्या भिंती उभ्या राहिल्या.त्याच्याच जोडीला प्लॅस्टिकचा भस्मासूर उभा राहिला.पण त्याची विल्हेवाट मात्र लावायचे राहूनच गेले. प्लॅस्टिकचा वापर आपण २०व्या शतकापासून सुरु केला.परंतु त्याच्या वापराचा अतिरेक झाला आहे. आमच्या बालपणी घरात अनेक डालडा,तेल यांचे डबे दिसत होते.त्याच बरोबर तांब्या पितळेचे,काही प्रमाणात अॅल्युमिनीअमची भांडी मोठ्याप्रमाणावर वापरली जात ...
Posts
Showing posts from October, 2021