Posts

Showing posts from May, 2025
Image
  लोक काय म्हणतील ?... आयुष्यातील एक कप्पा असा असतो की , जो उघडून अलगदपणे त्यातील आठवणी त आपणधुंद होऊन जातो. पण त्याच वेळी एक कप्पा असा  खचाखचपणे भरलेला असतो की , तो आपणाला कधीही बाहेर काढावा वाटत नाही. त्यामुळे प्रचंड अगदीकतेने , दुःखाने आपणव्याकुळ होतो ,   परंतु आपण ती गोष्ट कुणालाही सांगू शकत नाही आणि त्यामध्ये तुडुंब भरलेल्या असतो एकच प्रश्न , लोक काय म्हणतील ? लोक काय म्हणतील ?            माणसाचा जन्म झाल्या नंतर समजायला लागल्यापासून ते मरेपर्यंत सगळ्यात विध्वंसक , त्रासदायक ठरणारा व प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी सातत्याने छळणारा एकच प्रश्न तो म्हणजे   लोक काय म्हणतील ?          खरोखरच आयुष्यभर आपण या प्रश्नात इतके अकंठ बुडालेले असतो की लोक काय म्हणतील या प्रश्नातील अनेक गोष्टीत आपणच हरवून जातो. आयुष्यामध्ये आहे या ठिकाणी थांबून ; थोडे मागे वळून पाहिले तर आपणास असे लक्षात येते की , आपल्या आयुष्यातले अनेक क्षण अगदी सहज ; अलगदपणे निसटून जातात , पुन्हा वेचता न येण...